पिंपरी – नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मतदारांना केले आहे. सोनालीने आज हिरकणी चित्रपटाच्या प्रमोशनातून वेळ काढून निगडी-प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.
सोनाली कुलकर्णी म्हणाली कि, नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे. फक्त फोटो काढून इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर सेल्फी टाकण्यासाठी मतदान करू नका. प्रत्येक मत हे मौल्यवान आहे. उमेदवाराची पार्श्वभूमी तपासून विचारपूर्वक मतदान करा. धर्म, जातीवर आधारित मतदान न करता उमेदवाराची कार्यक्षमता पाहून मतदान करा. पुढची पाच वर्ष तुम्हाला कशी हवी आहे, याचा विचार करून मतदान करा, असे आवाहन सोमवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.