सातारा, माढा मतदारसंघात आज मतदान

प्रशासन सज्ज : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन

सातारा- जिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि.23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सातारा मतदार संघात 18 लाख 23 हजार 476 इतके तर माढा लोकसभा मतदारसंघात 19 लाख 4 हजार 895 मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या जवळपास बरोबरीने आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रबोधनात्मक कंबर कसली आहे. तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

पुरेशा संख्येने ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीन), व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मतयंत्रांची उपलब्धता, निवडणूक कर्मचारी व पोलिस बंदोबस्ताचे नियोजन, संवेदनशील केंद्रांवर वेब कास्टिंग, टपाली मतदानाची सोय, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि भरारी पथकांची नियुक्ती, अशी चोख तयारी करत सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी शंभर टक्के सज्ज असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य सात उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशीन बंद होणार आहे. सातारा जिल्ह्याचे 24 लाख 50 हजार मतदान सातारा लोकसभेच्या भावी खासदाराचा निर्णय घेणार आहेत.

कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 47 हजार 660 तर महिला मतदार 1 लाख 40 हजार 624 आणि 1 तृतीयपंथीय मतदाराची नोंद या मतदारसंघात आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 47 हजार 767 तर महिला मतदार 1 लाख 38 हजार 287 आणि दोन तृतीयपंथीय मतदारांची नोंद या मतदारसंघात आहे. तर पाटण विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 49 हजार 638 तर महिला मतदार 1 लाख 46 हजार आणि तीन तृतीयपंथीय मतदारांची नोंद या मतदारसंघात करण्यात आलेली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 19 लाख 4 हजार 895 इतकी आहे. त्यापैकी महिला मतदारांची संख्या 9 लाख 5 हजार 637 इतकी आहे. पुरूष मतदारांची संख्या 9 लाख 99 हजार 195 इतकी असून तृतीयपंथीय मतदार 13 आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय मतांची संख्या पाहता माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 74 हजार 407 तर महिला मतदार 1 लाख 63 हजार 820 इतके आहेत. फलटण विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदारसंघात 1 लाख 70 हजार 387 तर महिला मतदार 1 लाख 59 हजार 775 आहेत. त्याचबरोबर एका तृतीयपंथीय मतदाराची देखील नोंद करण्यात आलेली आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 67 हजार 543 तर महिला मतदार 1 लाख 51 हजार 907 असून 11 तृतीयपंथीय मतदारांची देखील नोंद करण्यात आली आहे. सांगोला मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 54 हजार 921 तर महिला मतदार 1 लाख 35 हजार 395 आणि 1 तृतीयपंथीय मतदाराची नोंद करण्यात आलेली आहे. माढा विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 72 हजार 113 तर महिला मतदार 1 लाख 52 हजार 569 इतके आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 60 हजार 724 तर महिला मतदार 1 लाख 42 हजार 171 इतके आहेत.

दरम्यान, यंदाच्या निवडणूकीत मतदार नोंदणीपासून ते मतदान करण्याकरिता निवडणूक आयोग प्रयत्न करताना दिसून येत आहे. मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी देखील आयोगाने एक ही मतदार वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करित आहे. विशेषत: अपंगांना मतदान करता यावे यासाठी वाहनाची सोय देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर युवक वर्ग देखील मतदानासाठी उत्साहीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे मागील निवडणूकीच्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी निश्‍चितपणे वाढलेली दिसून येईल.

सातारा लोकसभेसाठी 2272 मतदान केंद्र
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 2 हजार 272 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी वाई विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 448 मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. तसेच सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात 432, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 354, कराड- उत्तरमध्ये 336, कराड-दक्षिणमध्ये 305 आणि पाटण विधानसभा मतदारसंघात 397 मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत.

मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रकियेस सुरुवात होणार असून ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 23 हजार 476 मतदार आहेत. त्यापैकी महिला मतदारांची संख्या 9 लाख 3 हजार 92 इतकी तर पुरूष मतदारांची संख्या 9 लाख 35 हजार 878 एवढे आहेत. त्याचबरोबर 16 तृतीय पंथीय मतदारांची देखील नोंद करण्यात आलेली आहे. सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 66 हजार 350 तर महिला मतदार 1 लाख 64 हजार 361 आणि 8 तृतीयपंथीय मतदारांची नोंद या मतदारसंघात करण्यात आलेली आहे. वाई विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 65 हजार 460 तर महिला मतदार 1 लाख 62 हजार 35 तसेच 2 तृतीयपंथीय मतदारांची नोंद करण्यात आली आहे. कोरेगाव विधानसभा विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार 1 लाख 51 हजार 745 इतके तर महिला मतदार 1 लाख 42 हजार 923 इतके आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.