अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदासाठी मतदान

काबुल – अफगाणिस्तानी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शनिवारी कडक सुरक्षेत मतदान झाले, तसेच देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये बंडखोरांनी मतदान केंद्रावर हल्ला चढविला, त्यात कमीतकमी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान रक्‍तपात आणि हिंसाचार झाला होता. अध्यक्ष अशर्रफ गनी आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला, हे देशाचे अध्यक्ष बनण्यासाठी ही निवडणूक होत आहे.

काबूलला सावध अधिकाऱ्यांनी आंशिक लॉकडाऊनखाली ठेवले. सैन्याने गल्ल्‌यांचा ताबा घेतला आणि ट्रकना शहरात प्रवेश करण्यावर बंदी घातली. रहिवाशी मत देत असताना त्यांच्यावर हल्ला केला जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
दुपारपर्यंत, मागील निवडणुकांच्या तुलनेत मतदानाचा जोर फारच कमी दिसला, तोपर्यंत कोणत्याही घातपाताचे वृत्त नव्हते.

मात्र जलालाबादजवळ झालेल्या एका स्फोटामध्ये एक जण मरण पावला आणि दोघेजण जखमी झाले. असे पूर्व नांगरहात प्रांताचे राज्यपालांचे प्रवक्ते अत्ताउल्लाह खोग्यानी यांनी सांगितल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी एएफपीला सांगितले. तर देशभरातील अधिकाऱ्यांनी इतर निवडणुकांच्या ठिकाणी अनेक लहान स्फोट झाल्याची माहिती दिली.

“युद्धग्रस्त राष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करणारा नेता शोधणे.’ सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, असे मतदान केल्यावर गनी म्हणाले. शांततेसाठीचा आमचा रोडमॅप तयार आहे, शांतता मिळावी म्हणून लोकांनी आम्हाला परवानगी आणि कायदेशीरपणा द्यावा अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले. दोन महिन्यांच्या निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान बॉम्बस्फोट करणाऱ्या तालिबान्यांनी अनेक मतदान केंद्रांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

2014 च्या निवडणुकीत अब्दुल्ला आणि गनी यांनी विजयाचा दावा केला होता. मतदानाचा आणि हिंसाचारामुळे घटनात्मक संकट निर्माण झाले आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी तडजोडी घडवून आणली. त्यामुळे अब्दुल्ला यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)