वॉशिंग्टन -अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
शनिवारपर्यंत अमेरिकेतील 9 कोटी 20 लाख नागरिकंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 3 कोटी 30 लाख नागरिकांनी प्रत्यक्ष आणि 2 कोटी 80 लाख नागरिकांनी टपालाद्वारे आपले मत नोंदवले आहे.
मात्र, या निवडणुकीचा खरा महत्त्वाचा टप्पा 3 नोव्हेंबर रोजी (भारतीय वेळेनुसार उद्या) असणार आहे. मतदानाची वेळ समाप्त झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक राज्यानुसार ही मतमोजणीची वेळ वेगवेगळी असणार आहे.
इलेक्टोरल कॉलेज व्होटचे महत्त्व अनन्यसाधारण…
दोन्ही उमेदवारांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक राज्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात इलेक्टोरल कॉलेज व्होटचेही प्रमाण ठरलेले असते. ही इलेक्टोरल कॉलेज व्होटची एकूण संख्या 538 इतकी आहे. त्यामुळे 270 इलेक्टोरल कॉलेज व्होटपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो.