नवी दिल्ली – गोवा, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे रिक्त असलेल्या सहा विधानसभा मतदार संघासाठी 19 मे 2019 ला पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना 22 एप्रिल 2019 ला जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल 2019 आहे. अर्जांची छाननी 30 एप्रिलला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 2 मे 2019 आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होईल. गोव्यात पणजी विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक होत आहे.