मनपाच्या प्रभाग 6अ साठी आज मतदान 

नगर  – महापालिकेच्या “प्रभाग 6 – अ’ च्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी 7 फेब्रुवारीला माळीवाडा भागात असलेल्या जुनी महापालिका इमारत येथे होणार आहे.

सावेडी उपनगरामध्ये असणाऱ्या “प्रभाग 6 अ’ या अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी शिवसेना-भाजप यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून जोरदार प्रचार केला. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या दारात महाविकास आघाडीचा प्रस्ताव घेवून गेले होते.

परंतु यावर अद्यापही आमदारांनी निर्णय जाहीर केला नसल्याने शिवसेनाही एकाकी लढत देत आहे. उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी 13 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. 16 हजार 621 मतदार आहेत. मतमोजणी शुक्रवारी (7 फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी 105 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.