Haryana Election 2024 | हरियाणामध्ये आज 5 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. नुकतेच ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारतीय नेमबाज मनू भाकरने झज्जरमधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारतीय नेमबाज मनू भाकर म्हणाली, “हे माझे पहिले मतदान आहे. मला वाटते की, या देशातील तरुण म्हणून आपले मत देणे ही आपली जबाबदारी आहे. जो योग्य वाटेल त्यालाच मतदान करा. देशाचा विकास आपल्या हातात आहे. आपल्याला आपला जनप्रतिनिधी निवडला पाहिजे. ”
#WATCH झज्जर: ओलंपिक पदक विजेता और भारतीय निशानेबाज मनु भाकर ने कहा, “यह मेरा पहला मतदान है… मुझे लगता है कि इस देश के युवा होने के नाते, यह हमारी जिम्मेदारी है कि हम अपना वोट डालें। आपको जो सबसे अच्छा लगे, उसे वोट देना चाहिए… देश का विकास हमारे हाथ में है… हमें अपना… https://t.co/nptLGOD48V pic.twitter.com/bXCxlisKZr
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वरील पोस्टमद्वारे मतदान करणाऱ्याचे आवाहन केले आहे. ‘आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करतो की, लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करा. या निमित्ताने राज्यातील सर्व तरुण मित्रांना माझ्या विशेष शुभेच्छा जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.’
दरम्यान, हरियाणात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत.
90 जागांसाठी एकूण 1031 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 101 महिला उमेदवार, तर 464 अपक्ष उमेदवार आहेत. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेसाठी आज शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचवेळी, जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांसह मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.