पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती 

कर्जत – विधानसभेचे मतदान 21 ऑक्‍टोबर रोजी होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबे येथील विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. शपथ झाल्यानंतर गावातून ढोल, ताशे व व लेझीमच्या गजरात फेरी काढून येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मतदार राजा जागा हो हे पथनाट्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, आपल्या मताचे आहे दान लोकशाहीची शान अशा घोषणा दिल्या.

शाळेचे मुख्याध्यापक मारुती मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती शपथ दिली. यावेळी त्यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्यात कसूर करू नये. विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये मतदान जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच लोकशाही परंपरा मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच धर्म, जात, समाज, भाषा, यांचा प्रभाव न पडू न देता नक्की मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी पालकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घेणार आहेत. यावेळी सरपंच रामचंद्र खामगळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रणधरे यांनी मतदान जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांच्या रांगोळी, घोषवाक्‍य, प्रश्‍नमंजुषा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र खामगळ यांनी केले. यावेळी परमेश्‍वर रणधरे, संजय मिसाळ, मधुकर गदादे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)