Ashish Shelar targeted Sharad Pawar | शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनामध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले आणि आता मंत्री शेलार यांनी पलटवार केला आहे. विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचे राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केले. शरद पवारांचा कुठेतरी तोल जाऊ लागलाय याची चिंता वाटते, असे आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.
मराठी माणसाने तुम्हाला हद्दपार केले
“अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला. तुम्ही तडीपारीची भाषा करता, हीच भाषा आणि अशाच वक्तव्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मित्रपक्षाला महाराष्ट्राने हद्दपार केले. तुम्ही तडीपारीची भाषा आम्हाला सांगू नका. महाराष्ट्रातील मराठी माणसाने तुम्हाला हद्दपार केले त्याचे चिंतन करा,” असा घणाघात भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी शरद पवारांवर केला आहे.
“शरद पवारांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केले. मात्र, हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचे कोणते विचारमंथन तुम्ही केले होते? कोणाच्या विरोधात केले होते, याबाबतचे सत्यही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या,” असे आवाहन शेलार यांनी केले. Ashish Shelar targeted Sharad Pawar |
“… हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका”
“अमित शहा यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. सत्याचाच विजय होतो. न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून शहा यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका,” असा इशाराही शेलार यांनी दिला. Ashish Shelar targeted Sharad Pawar |
“पवारांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरेंना दिले”
“शरद पवार यांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे. हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिसून आले. या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही मविआ एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे,” असा टोलाही शेलार यांनी लगावला.
हेही वाचा:
Pune : पतंगबाजीचा आनंद पक्षांच्या जीवावर; शहरातील अनेक भागात मांजात अडकले पक्षी