बसस्थानकांवर मतदार सहायता कक्ष

-हजारो नागरिकांनी घेतला निवडणूक आयोगाच्या माहितीचा लाभ
-मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती

नगर – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक विषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या निमित्ताने अहमदनगर शहरातील बस स्थानक क्रमांक एक, दोन व तीन वर मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मतदार माहिती फलक, मतदार सेल्फी पॉइंट, त्याबरोबरच मतदान यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी व मतदान केंद्राच्या अन्य माहितीसाठी 1950, एन व्ही एस पी डॉट इन, वॉटर हेल्पलाइन सुविधा, पीडब्ल्यूडी, मतदान केंद्रांची रचना इत्यादी निवडणूक व मतदान विषयक माहिती दर्शविणारे फलक मतदार सहायता कक्षात लावण्यात आले आहेत.

तीन दिवसांमध्ये सुमारे दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या मतदार सहायता कक्षाला भेट देऊन आपल्या मतदान केंद्राची माहिती जाणून घेण्या बरोबरच मतदार जनजागृती प्रबोधनाची देखील माहिती घेतली. लोकांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून मतदार जनजागृती स्पर्धेमध्ये सहभाग देखील घेतला. त्याचबरोबर मतदारांकडून संकल्पपत्र देखील भरून घेण्यात आली. भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, व जिल्हा निवडणूक शाखा अहमदनगर यांच्या माध्यमातून स्वीप मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदार सहायता कक्षाच्या उपक्रमासाठी बस स्थानक आगार प्रमुख रामदास व्यवहारे, शिवाजी कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. उपक्रमासाठी कॅम्पस ऍम्बेसिडर राहुल पाटोळे, संदीप कुसळकर, डॉ. चोपडे यांनी सहकार्य केले.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निवडणूक हेमा बडे, स्वीप नोडल ऑफिसर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले, मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी मार्गदर्शन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.