मतदान ‘चुकल्या’ने बसपा कार्यकर्त्याने स्वत:ला केले जखमी

लखनौ – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. अत्यंत उत्साहात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, बुलंदशहरमधील एक धक्‍कादायक घटना समोर आली आहे. ईव्हीएम मशीनवर चुकून बसपाऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोट कापल्याची घटना घडली आहे.

बुलंदशहरमधील शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. पवन सिंह असे बोट कापणाऱ्या तरुणाचे नाव असून तो हुलासन गावचा रहिवासी आहे. बुलंदशहर मतदारसंघातून बसपाने उमेदवार योगेश शर्मा यांना तिकीट दिले आहे तर त्यांच्याविरोधात भाजपाने भोला सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

शिकारपूर भागातील मतदान केंद्रावर पवन सिंह मतदान करण्यासाठी गेला होता. मात्र बसपऐवजी भाजपला त्याने मत दिले. चुकून भाजपाचे चिन्ह असलेले बटण दाबले. त्याच्या या चुकीचा त्याला पश्‍चाताप झाल्यावर त्याने मतदानानंतर स्वत:च्या हाताचं बोट कापलं. पवनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.