व्होटर कार्ड “आधार’शी लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

नवी दिल्ली – देशातील नागरिकांची ओळख म्हणजे त्या व्यक्तीचं आधारकार्ड असं म्हटलं जात. मात्र या आधारकार्डमध्ये देखील बनावट कार्ड तयार होत असल्याचे समोर आले आहे.

देशातील एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळी ओळखपत्रे तयार केली जात आहे आणि हेच रोखण्यासाठी, त्याला “आधार’ कार्डशी जोडण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने मांडला आहे. लोकसभेत यावर चर्चा करताना कायदा आणि न्याय मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली असून या प्रकरणावर सरकार विचार करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सध्याच्या काळात “आधार कार्ड’ हे एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. यावरील 12 अंकी क्रमांकात व्यक्तीची बायोमेट्रिक तपशीलांसह संपूर्ण ओळख लपलेली आहे. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीद्वारे आधार कार्ड दिले जाते. युआयडीएआय “आधार’शी संबंधित विविध सेवा ऑफर करते ज्याचा वापर कार्डधारकांद्वारे ऑनलाइन केला जाऊ शकतो. यामध्ये आधार पडताळणीची सुविधा देखील समाविष्ट आहे, ज्याद्वारे आधार कार्डची पडताळणी करू शकतात.

यूआयडीएआयने एका ट्‌वीट पोस्टमध्ये आधारची ऑनलाइन पडताळणी करण्याची गरज आणि त्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले होते. आधार वापरण्यापूर्वी, आपला आधार क्रमांक Active आहे की नाही हे पाहिले पाहिजे. यासह, आपल्या आधार कार्डवर छापलेली माहिती युआयडीएआयच्या डेटाबेसच्या तपशीलांशी जुळत आहे की नाही, हे देखील माहित असले पाहिजे. कोणत्याही आधारची पडताळणी युआयडीएआय वेबसाइट किंवा एमआधार ऍपवरून करता येते.

 

कसे कराल “आधार’ व्हेरिफिकेशन?
1. सर्वात पहिल्यांदा UIDAI वेबसाइट uidai.gov.in संकेतस्थळावर भेट द्या
2. यानंतर Service मेनूमधून “आधार नंबर व्हेरिफाय’ या पर्यायाला निवडा.
3. यामध्ये 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
4. नंतर Verify करण्यासाठी पुढे जा. जर “आधार क्रमांक’ खऱा असेल तर त्याची पडताळणी केली जाईल.
5. वय, लिंग, राज्य आणि त्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन/चार अंक यासारखे तपशील स्क्रीनवर दिसतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.