संगमनेर पालिकेच्या पोटनिवडणुकीत शांततेत मतदान

संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग 10 (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी आज तीन हजार 517 मतदारांपैकी दोन हजार 361 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या निवडणुकीत संगमनेर मर्चन्ट बॅंकेचे संचालक राजेंद्र कारभारी वाकचौरे (कॉंग्रेस), कविता सुरेश तेजी (शिवसेना), कन्हय्या गुलाब कागडे (अपक्ष) व माजी नगरसेवक घनश्‍याम रमेश जेधे (अपक्ष) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नगरपालिकेच्या कल्पना चावला प्राथमिक शाळेतील बूथ क्रमांक एक वर 838, दोनवर 809, तर देवेंद्र ओहरा महाविद्यालयातील बूथ क्रमांक तीनमध्ये 714, अशा दोन हजार 361 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या (दि. 24) सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.