मतमोजणी आधीच ‘गुलाल आपलाच’चे पोस्ट व्हायरल …

पुणे – 13 व्या विधानसभा निवडणूकीसाठी आज 288 मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीमुळे उमेदवारांच्या मनात धाकधुक निर्माण झाली असून निवडणूकीत कुणाला जनादेश मिळणार याबाबत अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. दिवाळीआधीच विजयी उमेदवारांचे फटाके फुटणार आहेत. तर दुसरीकडे मतमोजणीच्या लाईव्ह अपडेटची दखल घेत सर्व पक्षाच्या उमेदवारांनी फेसबुक पोस्टद्वारे ‘गुलाल आपलाच’ या कॅशन देत मतमोजणी
अधीच निकाल जाहीर केला आहे.

तत्पूर्वी, अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या तसेच राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात रोहित पवार विजयी झाल्याचे फलक लगावले होते.

तर आज फेसबुक , व्हाट्स अँप्सवर रोहित पवार यांच्या विजयाचे पोस्ट उत्साही कार्यकर्त्यांद्वारे पोस्ट केले जात आहे. दरम्यान,राज्यातील विधानसभा निवडुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. जनता कुणाच्या गळ्यात विजयची माळ टाकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.