नवी दिल्ली: मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर पेट्रोल व डिझेलवर प्रति लिटर ५० पैसे सूट मिळणार आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने असे स्पष्ट केले आहे. ही सवलत निवडक पेट्रोल पंपवर दिली जाईल.
आल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल म्हणाले, आज पेट्रोल विक्रेत्यांची बैठक झाली त्यामध्ये मतदार मतदान केल्यानंतर आपल्या बोटाची शाई दाखवून या सवलतीचा फायदा घेऊ शकतो. जास्तीत जास्त विक्रेते ही सवलत देणार आहेत.