वोडाफोन परदेशातून गुंतवणूक उभी करणार

नवी दिल्ली – विदेशी गुंतवणूकदार वोडाफोन-आयडियाच्या राईट इश्‍यूमध्ये सुमारे 18 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याची शक्‍यता आहे. यामध्ये प्रवर्तक वोडाफोन समूहाची जास्त हिस्सेदारी असणार आहे. यासाठी कंपनी 25 हजार कोटी रुपयांचा राईट इश्‍यू 10 एप्रिलला खुला करणार आहे.

वोडाफोन-आयडियाने सरकारकडे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) करण्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून 18 हजार कोटी रुपये मिळू शकणार आहेत. प्रमोटर्स वोडाफोन ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुपने संचालक मंडळाकडे 18 हजार कोटी रुपये गुंतवणुकीबाबत प्रस्ताव मांडला होता.

दरम्यान, वोडाफोन ग्रुपकडील उपलब्ध फंड राईट इश्‍यूमध्ये विदेशी गुंतवणुकीत समाविष्ट होईल तर आदित्य बिर्लाही आपल्या विदेशी संस्थांकडून गुंतवणूक करून घेऊ शकेल. राईट इश्‍यूद्वारे कंपनी आपल्या शेअर्सधारकांना गुंतवणुकीची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देत आहे. 5 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विदेशी गुंतवणुकीला मंत्रालयाच्या मंजुरीची आवश्‍यकता असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.