मॉस्को – अफगाणिस्तानमधील तब्बल 20 वर्षांच्या मोहिमेतून केवळ “शून्य’ हाती लागले आहे, अशी टीका रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी केली आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करत आहे.
तेथीन नागरिकांमध्ये अमेरिकेचे नागरिकत्वाचे निकष रुजवण्याचा प्रयत्न केला जात होता. तेथील समाजामध्ये राजकीय संघटना रुजवण्याचाही प्रयत्न अमेरिकेच्या वतीने करण्यात आला होता. मात्र निष्कर्श म्हणून अमेरिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संबंधितांसाठी केवळ आपत्ती आणि केवळ नुकसानच लाभले. जरी नकारात्मक निकाल मिळाला नसेल तर किमान शून्य निकाल तरी निश्चितच मिळाला आहे, असे पुतीन म्हणाले.
कोणावरही बाहेरून कोणतीही गोष्ट लादली जाऊ शकत नाही. जर तसे कोणी करत असेल तर तेथील लोकांच्या जीवनमानावर, इतिहास आणि जीवनविषय तत्वज्ञानावरही व्यापक अर्थाने परिणाम होतो. स्थानिक संस्कृतीचा योग्य मान राखला जायला हवा , असेही पुतीन म्हणाले.
रशियाने अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी करून तब्बल 10 वर्षे तेथे युद्ध केले होते. मात्र अखेरीस रशियाला अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या संदर्भात मध्यस्त म्हणून रशियाने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून द्यायला सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमधील विविध गटांना रशियाने चिथावणीच दिली आहे. तालिबानला दहशतवादी संघटना असे रशियाने म्हटले आहे. मात्र अमेरिकेविरोधात भडकावलेही आहे.