Vladimir Putin । रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा आपल्याच नावाचा शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 88 टक्के मतांनी पुतीन यांनी दणदणीत विजय मिळवलाय. सलग पाचव्यांदा पुतिन रशियाची सत्ता हातात घेणार आहेत. एका इंगेजी वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिलंय. रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार, व्लादिमीर पुतिन यांनी 87.97 टक्के मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला.
राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म Vladimir Putin ।
पुतीन यांची राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असणार आहे. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही.
तीन दिवसीय निवडणुका अत्यंत नियंत्रित वातावरणात पार पडल्या. रशियामध्ये युक्रेन युद्धासाठी व्लादिमीर पुतिन यांच्यावर सार्वजनिक टीका करण्याची परवानगी नाही. पुतीन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झालेला. 71 वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली, ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. तिघांनीही त्याच्या 24 वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणं टाळलं.
व्लादिमीर पुतिन यांनी जोसेफ स्टालिन यांचा रेकॉर्ड मोडला Vladimir Putin ।
पुतिन यांच्या हजारो विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली. रशियातील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मुक्त किंवा निष्पक्ष नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या विजयासह केजीबीचे माजी लेफ्टनंट कर्नल व्लादिमीर पुतिन यांना 6 वर्षांचा नवीन कार्यकाळ मिळाला आहे. यासह, रशियामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या बाबतीत त्यांनी जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकलं आहे. 200 वर्षांहून अधिक काळ रशियाचे सर्वात जास्त काळ राष्ट्रप्रमुख राहण्याचा विक्रम पुतिन यांच्या नावावर आहे.