Vivo Y19e Launched | Vivo ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y19e लाँच केला आहे. या फोनची किंमत 8 हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे. या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणाऱ्या Vivo Y19e स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Vivo Y19e स्मार्टफोनची किंमत
Vivo Y19e स्मार्टफोन Titanium Silver आणि Majestic Green या दोन रंगात येतो. या फोनची किंमत 7,999 रुपये आहे फोनला Flipkart, Vivo India ई-स्टोर आणि सर्व पार्टनर रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता.
Vivo Y19e हँडसेटसोबत एक खास जिओ प्रीपेड प्लॅन उपलब्ध असेल. या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या अतंर्गत दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा फायदा मिळेल.
Vivo Y19e स्मार्टफोनचे फीचर्स
Vivo Y19e मध्ये 6.74-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. हा फोन ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो या हँडसेटमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेच, डिव्हाइसजे वजन 199 ग्रॅम आहे. व्हिवोच्या या फोनमध्ये कंपनीने Unisoc T7225 octa-core प्रोसेसर दिला आहे.
फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. रॅमला 4 जीबीपर्यंत वाढवता येईल. तसेच, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2 जीबीपर्यंत वाढवू शकता. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 13 मेगापिक्सलचा ड्युअल AI कॅमेरा सेटअप दिला आहे. यासह अनेक एआय फीचर्स मिळतील. तर फ्रंटला सेल्फी व व्हीडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
Vivo Y19e मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,500mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2, FM रेडिओ, GPS, OTG, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS आणि Wi-Fi हे फीचर्स दिले आहेत.