स्मार्ट फोन विश्‍वातील “तगडे’ न्युकमर्स…

अॅॅपल आणि सॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्या. दोन्ही कंपन्यांचे स्मार्टफोन्स देखील अत्याधुनिक फिचर्स व प्रभावी डिझाईनद्वारे नटलेले. उत्कृष्ट कॅमेरा, मजबूत व टिकाऊ बॉडी, चांगली बॅटरी, नितळ डिस्प्ले या सगळ्या बरोबरच प्रत्येक वर्षी सादर करण्यात येणाऱ्या कंपनीच्या आघाडीच्या म्हणजेच “फ्लॅगशिप’ स्मार्टफोन सोबत काहीतरी “हटके’ फिचर देण्याचा अॅॅपल आणि सॅमसंगचा प्रयत्न असतो. असा नाविन्यतेने नटलेला काहीतरी नवीन फीचर असलेला स्मार्टफोन आपल्याकडे देखील असावा अशी आजकालच्या तरुणाईची अपेक्षा असते. पण तरुणाईच्या या अपेक्षेचा “भंग’ करण्यासाठी एखाद्या व्हिलन प्रमाणे आडवी येते ती म्हणजे अॅॅपल आणि सॅमसंगच्या स्मार्टफोन्सची “भरमसाठ’ किंमत! आपल्या खिशाला असे फोन परवडत नाहीत आणि जे फोन परवडतात त्यांच्यामध्ये पाहिजे ते फिचर्स मिळत नाहीत असा “प्रॉब्लेम’ बहुतेकांना सतावतो. हाच प्रॉब्लेम सोडविण्यासाठी जन्म झाला स्मार्टफोन क्षेत्रातील एका नव्या ट्रेंडला तो म्हणजेच “फ्लॅगशीप-किलर’ स्मार्टफोनला. नावाप्रमाणेच “फ्लॅगशीप-किलर’ म्हणजे असा स्मार्टफोन जो फिचर्स तर सगळे अॅॅपल आणि सॅमसंग सारख्या आघाडीच्या ‘फ्लॅगशीप’ प्रमाणेच देतो मात्र किंमत त्यांच्यापेक्षा निम्मी! खिशाला “परवडेबल’ अशा या “फ्लॅगशीप-किलर’ स्मार्टफोन्सची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशाच काही परवडेबल स्मार्टफोन्सची यादी खास आपल्यासाठी….

विवो नेक्‍स: अॅॅपलने मागच्या वर्षी आयफोन एक्‍स सादर करीत जगभरामध्ये धुमाकूळ घातला होता. 3.5 एमएम हेडफोन जॅक पाठोपाठ “बेझल्स’ला आऊटडेटेड ठरवत नॉच डिस्प्ले दिला होता. आयफोन एक्‍सच्या नंतर स्मार्टफोन बाजारपेठेतील सर्वाधिक ट्रेंडी डिझाईन आहे ती म्हणजे विवि नेक्‍सची. समोरच्या बाजूस संपूर्ण डिस्प्ले असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये पुढील बाजूचा कॅमेरा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा असून कॅमेरा अॅॅप्लिकेशन चालू करताच पुढील बाजूने फ्रंट फेसिंग कॅमेरा फोनच्या बॉडी मधून बाहेर येतो व कॅमेरा अॅॅप्लिकेशन बंद करताच परत आत जातो. याशिवाय या फोनमध्ये पहिल्यांदाच ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर अर्ध्या भागात कोठेही बोट ठेवले तरी हा स्मार्टफोन अनलॉक होतो. 8 जी.बी. रॅम 128 जी.बी. स्टोरेज व स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, मागील बाजूस ड्युअल कॅमेरा या फोन मध्ये दिला असल्याने ग्राहकांसाठी “हा’ स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनप्लस 8 : अप्लावधीतच नावारूपाला आलेली वनप्लस ही स्मार्टफोन कंपनी आपल्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. वनप्लस 3 पासून वनप्लस 6 पर्यंतच्या सर्वच स्मार्टफोन्सने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला. नुकत्याच लॉन्च झालेल्या वनप्लस 6 ने वनप्लस फोन्सच्या विक्रीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्डस ब्रेक केले आहेत. 8 जी.बी. रॅम, 128 जी.बी. स्टोरेज, ड्युअल कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, ऑक्‍सिजन ऑपरेटिंग सिस्टीम नॉच डिस्प्ले, फास्ट चार्जिंग अशी या स्मार्टफोनची ठळक वैशिष्टे आहेत. आतापर्यंतचा सर्वात वेगवान फोन म्हणून या स्मार्टफोनने नाव कमवले आहे. स्ट्रॉंग प्रोसेसर आणि 8 जी.बी. रॅम यामुळे हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टिटास्किंग, फोटोग्राफी करताना लाग होणार नाही.

आसूस झेनफोन 5 झेड: आसूस या स्मार्टफोन कंपनीने वनप्लस 6 ला टक्कर देणारा आपला आसूस झेनफोन 5 झेड हा स्मार्टफोन सादर केला असून यामध्ये वनप्लस 6 मध्ये असणाऱ्या 8 जी.बी. रॅम, 128 जी.बी. स्टोरेज, ड्युअल कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, नॉच डिस्प्ले, फास्ट चार्जिंग यासर्व सुविधा देण्यात आल्या असून त्याची किंमत वनप्लस 6 पेक्षा 8 हजारांनी कमी ठेवण्यात आली आहे. आसूस झेनफोन 5झेडची किंमत कमी असली तरी फिचर्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन पूर्णपणे अपडेटेड असल्यामुळे वनप्लसला 6 ला आसूस झेनफोन 5 झेड हा ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)