विवेक ओबेरॉयची माघार; ट्विट केलं डिलीट

भाजपा नेते आणि भाजपा समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे. एक्झिट पोलच्या निकालानंतर सोशल मीडियावर भाजप पक्षाचं खुलेपणानं समर्थन करणारा अभिनेता ‘विवेक ओबेरॉय’ने सोशल मीडियावर एक वादग्रस्त ट्विट केलं होत. विवेकने ट्वीटमध्ये दुसऱ्या एका युझरचं मीम शेअर असून, या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत आहेत. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एक्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली होती. त्यामुळे सर्व स्तरातून विवेकवर टीकेचा भडीमार होत आहे. मात्र, याप्रकरणी विवेकने माफी मागितली असून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा त्याने डिलीट केलं आहे.

विवेक ओबेरॉयने दोनवेळा ट्विट केले आहे. यातील पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कधी-कधी कोणाला पहिल्यांदा जे मजेशीर आणि निरपराध वाटते. ते दुसऱ्यांना बहुतेक वाटत नाही. मी गेली दहा वर्षे 2000 हून अधिक असहाय्य मुलींच्या सशक्तिकरणासाठी घालविली आहेत. मी कधीही कोणत्याही महिलेचा अपमान करण्यासंदर्भात विचार करु शकत नाही.’

त्यानंतर, दुसऱ्या ट्विटमध्ये विवेक ओबेरॉयने म्हटले आहे, ‘जर मीमला दिलेल्या रिप्लायवरुन एकाही महिलेला ठेच पोहचली असेल, तर यामध्ये सुधारणा गरजेची आहे. त्यामुळे मी माफी मागतो. आणि ते ट्विट देखील डिलीट केलं आहे. असं विवेक म्हणाला.

https://twitter.com/vivekoberoi/status/1130679444174041088

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)