विवेक ओबेरॉय’ला महिला आयोगाची नोटीस; एक्झिट पोलनंतर केले होते वादग्रस्त ट्विट

मुंबई: “भाजपा नेते आणि भाजपा समर्थक यांचा वाचाळपणा जगजाहीर आहे. भाजपा समर्थक व सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय याने पद्मश्री पुरस्कार प्राप्त देशातील प्रसिद्ध महीलेबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद ट्वीट करूनही महिला आयोग यावर गप्प का”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.

एक्झिट पोलच्या निकालानंतर सोशल मीडियावर भाजप पक्षाचं खुलेपणानं समर्थन करणाऱ्या विवेक ओबेरॉयने वादग्रस्त ट्विट केले आहे. विवेकने ट्वीटमध्ये दुसऱ्या एका युझरचं मीम शेअर असून या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत आहेत. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एग्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली आहे.

दरम्यान, महिला आयोगाने विवेक ओबेरॉय यांना नोटीस दिली असून एक्झिट पोलवरील ट्विट बाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.