Vivek Oberoi New Home | बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विवेकने आलिशान घर पत्नीला खास गिफ्ट म्हणून भेट दिली आहे. ज्याची झलक त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दाखवली आहे.
विवेक ओबेरॉयने नवे घर घेतल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन देत लिहिले की, “14 वर्षांपूर्वी, आज धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी आम्ही आमच्या नवीन घरात जात आहोत. देवाची कृपा आणि वडिलांचे आशीर्वाद पाठी आहेत. तसेच फॅन्सीचा पाठिंबाही आहे. माझ्यासाठी तू माझे ‘घर’ आहेस आणि तूच माझे ‘हृदय’ आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!” Vivek Oberoi New Home |
View this post on Instagram
त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी विवेक ओबेरॉयला नवीन घरासाठी आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन घराच्या पूजेसाठी विवेक ओबेरॉयने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे तर पत्नी प्रियांकाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. Vivek Oberoi New Home |
दरम्यान, विवेक ओबेरॉयने प्रियंकासोबत २९ ऑक्टोबर २०१० रोजी बंगळुरूमध्ये लग्न केले होते. ते दोन मुलांचे पालक आहेत. विवेक ओबेरॉयला साथिया, शूटआउट ॲट लोखंडवाला, मस्ती या चित्रपटांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली.