मुंबई – ‘द कश्मीर फाईल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. नुकतच विवेकने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बोलीवूडबाबतच्या विधानावर भाष्य केलं आहे. विवेकने शेम..शेम.. शेम म्हणत एक ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. विवेकची शरद पवारांवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही या आधी देखील त्यांनी पवारांच्या विधानावर भाष्य केलं होत.
नागपूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात पवार म्हणाले होते,आजच्या तारखेत कला, कविता, लेखन याविषयी बोलायचे झाल्यास अल्पसंख्याकांमध्ये अधिक क्षमता असून ते त्यात अधिक योगदान देऊ शकतात,बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे ? मुस्लिम अल्पसंख्याकांचे सर्वाधिक योगदान आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असं पवार म्हणाले होते याबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यावरच आता विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं आहे.
बॉलीवूडमधील अल्पसंख्याकांच्या योगदानाबाबतची ही गोष्ट विवेक अग्निहोत्रीला खटकली म्हणून त्याने एक ट्विट केले. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, “शेम शेम शेम… देव तुम्हाला जन्नत देओ.. त्यांनी या जन्मताच नरक यात्रा भोगली आहे”.