मुंबई – काश्मीर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. द व्हॅक्सिन वॉर असं त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. काश्मीर फाईल्समध्ये विवेकने काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भाष्य केलं होत. त्यानंतर आता विवेक आपल्या आगामी चित्रपटात नवीन काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून, या महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावी असं अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या नावाची घोषणा करताना म्हंटले.पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे लसीचे संशोधन करणाऱ्या मुख्य पात्रासाठी कोणता चेहरा झळकेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
ANNOUNCEMENT:
Presenting ‘THE VACCINE WAR’ – an incredible true story of a war that you didn’t know India fought. And won with its science, courage & great Indian values.
It will release on Independence Day, 2023. In 11 languages.
Please bless us.#TheVaccineWar pic.twitter.com/T4MGQwKBMg
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 10, 2022
हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी जागतिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा ११ हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.