बाबा एकदम ठीक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अचानक अफवा पसरल्या आहेत. नसरूद्दीन शाह हे आजारी असून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्री उशीरा अचानक अफवा पसरवण्यात आली. ट्विटरवर #naseeruddinshah हा हॅशटॅग नंबर एकवर ट्रेंड करत होता. तसेच सोशल मीडिया युजर्स त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही करू लागले. त्यानंतर त्यांचा मुलगा विवानने ट्वीट करून सर्व अफवा असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचं स्पष्ट केलं.


विवान शाहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘सगळं काही ठीक आहे. बाबा एकदम ठीक आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत केल्या जाणाऱ्या सर्व चर्चा चुकीच्या आहेत, अफवा आहेत. ते इरफान आणि चिंटूजींसाठी प्रार्थना करत आहेत. या दोघांची त्यांना खूप आठवण येत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली आहे.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.