ऍमस्टरडॅम – नेदरलॅंडमध्ये सुरू असलेल्या एका फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात डचरेडीवाईस या मैदानातील प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही प्रेक्षक जखमीही झाले.
नेक निजमेन संघाचा विटस्सी अरहेमने 1-0 असा पराभव केल्यावर चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. तसेच या गॅलरीच्या जवळच ड्रेसिंगरूम असल्याने खेळाडूंना पाहता येईल या हेतूने कित्येक प्रेक्षकांनी या स्टॅंडवर दाटी केली. क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक असल्याने ही गॅलरी कोसळली.
गॅलरी कोसळल्याने फुटबॉल सामन्याला गालबोट
ऍमस्टरडॅम – नेदरलॅंडमध्ये सुरू असलेल्या एका फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात डचरेडीवाईस या मैदानातील प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.
Detail news – https://t.co/AichDIGObR pic.twitter.com/XOG1qeYB52
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 20, 2021
ही घटना घडल्यानंतरही प्रेक्षकांचा जल्लोष सुरूच होता. यावेळी चक्क दोन्ही संघातील खेळाडूंसह रेफ्री व आयोजकांनी प्रेक्षकांना शांत केले. या घटनेला कोण जबाबदार आहे तसेच हा अपघात कसा घडला, याची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे.