पुणे – वडगावशेरी विधानसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण केंद्रास मतदारसंघासाठीचे मुख्य निरीक्षक ललित कुमार दाहिमा यांनी भेट दिली. या वेळी ललित कुमार यांनी दृक-श्राव्य प्रशिक्षण कक्ष, हॅण्डस ऑन प्रशिक्षण कक्ष, तसेच टपाली मतदान सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाबाबत संपूर्ण माहिती घेतली आणि संबंधित पथकाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
या वेळी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते पाटील उपस्थित होत्या. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त १ हजार २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या टपाली मतदान सुविधा केंद्रामध्ये एकूण ४० प्रशिक्षणार्थीनी टपाली मतदानाचा हक्क बजावला.