पुणे: पाबळ येथील मस्तानी स्मृतिस्थळास वीर योद्धा मस्तानी च्या सातव्या, आठव्या व नवव्या वंशजांनी सहकुटुंब भेट दिली. यावेळी बाजीराव मस्तानी ट्रस्टच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी या स्थळाच्या मूळ वस्तूची व अंतर्गत रचनेची छायाचित्रे व माहिती दिली.
यावेळी वंशजांनी शासनाकडून या स्थळाच्या जतन कामाबद्दल नाराजी व्यक्त केली व सुविधेबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या तर ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले. मध्यप्रदेशातील उच्च अधिकारी असलेल्या इरफान अली या वंशजांनी, येथील पुनर्बांधणी करताना ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीपणाबाबत व चुकीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इशारा दिला.