पुणे – व्हिजन प्रिमिअर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत व्हिजन टायगर्स आणि व्हिजन जॅग्वार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली.
या स्पर्धेत व्हिजन जॅग्वार्स संघाने व्हिजन लेपर्डस्चा 40 धावांनी पराभव केला. व्हिजन जॅग्वार्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 164 धावा केल्या. यामध्ये गिरीष कोंडे याने 26 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.
व्हिजन लेपर्डस्चा डाव 124 धावांवर संपुष्टात आला. जॅग्वार्सच्या गिरीष कोंडे (3-17) व विजय पांडे (2-10) यांनी अचूक गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात व्हिजन टायगर्स संघाने व्हिजन लिंक्स् संघाचा 23 धावांनी पराभव केला.
टायगर्सने 20 षटकांत 7 बाद 134 धावांचे आव्हान उभे केले. टायगर्स संघाच्या प्रदीप साळुंके याने 31 धावांत 5 गडी बाद करून व्हिजन संघाचा डाव 16 षटकांत 101 धावांवर रोखला.