व्हिजन क्रिकेट स्पर्धेस मंगळवारपासून प्रारंभ

पुणे – पहिल्या व्हिजन प्रिमिअर लीग अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिजन स्पोर्ट्‌स सेंटर तर्फे 16 ते 25 वयोगटातील युवा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही अंतर्गत स्पर्धा 19 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर 2021 या कालावधीत व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान, सनसिटी रोड येथे होणार आहे.

येत्या 23 ऑक्‍टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी व्हिजन प्रिमिअर लीग या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हिजन क्रिकेट अकादमीतील 16 ते 25 वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या टी-20 स्पर्धेत व्हिजन टायगर्स, व्हिजन लेपर्डस्‌, व्हिजन पॅंथर्स, व्हिजन जॅगवॉर्स, व्हिजन लायन्स्‌ आणि व्हिजन लिंक्‍स संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पाहावयास मिळणार आहे. या

स्पर्धेत 15 साखळी सामने होणार आहेत. स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना 2 नोव्हेंबर रोजी तर, अंतिम सामना 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेत विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक बक्षीस व करंडक मिळणार आहे. याशिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत अशी माहिती स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.