चेन्नई – भारताचा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला लेजंड्स बुद्धिबळ स्पर्धेत रशियाच्या पीटर स्वीडलरकडून पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
स्वीडलरने आनंदवर 2.5-1.5 अशी मात केली. मे महिन्यात आनंदने ऑनलाइन नेशन्स करंडक बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मात्र, आनंदला स्वीडलरने चांगलीच लढत दिली व सर्वोत्तम चार या प्रकारच्या स्पर्धेत स्वीडलरने आनंदवर विजय मिळवला. आनंदने कार्लसन बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना चार फेऱ्यांच्या सामन्यात पहिल्या तीन फेरीत बरोबरी साधली. करोनाचा धोका वाढल्याने आनंदला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नव्हते.