सांगली लोकसभा2019 – महाआघाडीचा उमेदवार ठरला, राजू शेट्टींनी केली घोषणा

मुंबई – सांगली लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवारीबाबत अखेर तिढा सुटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विशाल पाटील यांना सांगली मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबतची घोषणा केली आहे.

विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. गेल्या 60 वर्षापासून वसंतदादा पाटील घराण्याची सांगली लोकसभा मतदारसंघावर एकहाती सत्ता आहे.

सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली होती. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडूनच किंवा अपक्ष लढणार असा निर्धार विशाल पाटील यांनी केला होता. मात्र शुक्रवारी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या झालेल्या बैठकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.