IPO Listing: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल वाढला आहे. अनेकजण गुंतवणुकीतून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आयपीओ खरेदी करतात. तुम्ही देखील आयपीओसाठी बोली लावण्याचा विचार करत असाल, तर सध्या बाजारात 3 आयपीओंची विशेष चर्चा आहे. या 3 आयपीओमध्ये Vishal Mega Mart, MobiKwik आणि Sai Life Sciences चा समावेश आहे.
या तिन्ही कंपन्यांच्या आयपीओंना ग्रे मार्केटमध्ये गुंतवणुकदारांची मोठी पसंती मिळत आहे. ग्रे मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रतिसादामुळे गुंतवणुकदारांचा कल या तिन्ही आयपीओकडे वाढताना दिसत आहे.या तिन्ही आयपीओचे सबस्क्रिप्शन 11 डिसेंबरला खुले झाले असून, 13 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदार बोली लावू शकतील.
Vishal Mega Mart IPO
विशाल मेगा मार्टच्या आयपीओ अंतर्गत कंपनी 8 हजार कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओची लॉट साइज 190 शेअर्सची असून, प्रति शेअर किंमत 74-78 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. शेअर्सची ग्रे मार्केट किंमत 20 रुपये प्रति शेअर आहे. त्यामुळे शेअर्स 98 रुपयांनी लिस्ट होण्याची शक्यता आहे.
One MobiKwik Systems IPO
या आयपीओची लॉट साइज 53 शेअर एवढी असून, प्रति शेअरची किंमत 265-279 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 136 रुपये आहे. त्यामुळे लिस्टिंगच्या वेळी कंपनीच्या प्रति शेअरची किंमत 415 रुपये असू शकते.
Sai Life Sciences IPO
साई लाइफ सायन्सेसच्या आयपीओची लॉट साइज 27 आहे. याची 522-549 रुपये प्रति शेअर किंमत निर्धारित करण्यात आली आहे. शेअरची ग्रे मार्केट किंमत 42 रुपयांवर आहे. त्यामुळे बाजारात लिस्टिंगवेळी प्रति शेअर किंमत 591 रुपये असण्याची शक्यता आहे.