याही रविवारी ‘विरुष्का’ने शेअर केला नवीन फोटो

रविवारची सुट्टी आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच्या मोकळ्या वेळेचे मुहूर्त साधून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.

हा फोटो शेअर केल्यानंतर काही कालावधीतच याला खूप पसंती मिळाली आणि त्याला काही मिलिअन पेक्षा जास्त लोकांनी पसंत केले. ‘विरुष्का’ नावाने ओळखले जाणारे हे जोडपे मागील काही आठवड्यांपासून दर रविवारी त्यांचा फोटो शेअर करत असते. यावेळी विराटने फोटो शेअर केला तर मागील आठवड्यात अनुष्का शर्माने फोटो शेअर केला होता.
मागील आठवड्यात विराट कोहलीला  इंस्टाग्रामच्या माध्यमातून मिळणारे मानधन खूप चर्चेचा विषय ठरले होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.instagram.com/p/Bl0uMYgA7s7/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)