अभासी जग आणि एकटेपणा

झोपडीपासून सुरु झालेला प्रवास सिलिकॉन व्हॅली पर्यंत जाऊन पोहचला आहे. कबुतरापासून सुरु झालेला निरोप आज ई-मेलपर्यंत गेला आहे. या सगळ्या मध्ये आपला आपुलकीचा संवाद मात्र तुटत चालला आहे.

आज अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या गरजां बरोबरच मोबाईल ही आपली गरज बनली आहे. आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती मुळे आणि त्यातून विकसित झालेल्या उपकरणा मुळे माणसं सहज जगाशी जोडली गेल्याच दिसतं हे वरवरच निरीक्षण, वास्तव कदाचित वेगळे आणि विरोधाभासी असावे.एकटेपणा वर मात म्हणून अभासी जग निर्माण झाल आहे. त्याचे आपण नागरिक आहोत. आपण त्यात रमतोय ते खरेखुरे नव्हे तर ते अभासी आहे. त्यातील भाव भावना खोट्या आहेत. हे समजे पर्यंत खूप उशीर झालेला असतो. मोबाईल मध्ये असणारे हजार संपर्क क्रमांक, गल्लीत कोणी विचारत नाही, पण फेसबुक वर यांचे पाच हजार मित्र ही स्थिती होताच जेव्हा व्यक्ती एकटेपणाच्या भावनेत अडकून जातो, इतका अडकतो की आसपासचे मिञ अभासी वाटू लागतात.आधी इतरांवरचा मग स्वतःवरचा विश्‍वास उडतो. रोज पडणारे प्रश्‍नांकडे नकारात्मकतेने पाहण्याच्या नकळत लागलेल्या सवयी व्यक्तीला पुरत्या चुकीच्या मार्गाला नेतात आणि आयुष्यातून उठवतात. या सगळ्या परिस्थितीत आपण आपला आंनद हरवत जातो.

आनंदाची संकल्पना प्रत्येकाची वेग वेगळी आहे. आनंद हा वजन काट्यावर मोजता येत नाही तो आपल्या मानण्यावर असतो. कोणता देश आनंदी आहे हे पाहण्यासाठी वर्ल्ड हॅपिनेस ही संस्था सर्वे करून रिपोर्ट सादर करत असते. 2012 मध्ये पहिला वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट जाहीर झाला होता. त्यावर्षी भारताचा 115 वा क्रमांक होता. 2018साली रिपोर्ट सादर झाला त्यामध्ये भारताचा 133 वा क्रमांक आहे. जगातील 156 देश या यादी मध्ये आहेत. हा रिपोर्ट जीडीपीमध्ये सर्व सामान्य माणसांचा सहभाग, त्यांचे सरासरी उत्पन्न, देशातील प्रामाणिकतेचा स्तर, नागरिकांचे अंदाजे आयुष्य, या गोष्टींचा विचार करून सादर केला जातो. हा रिपोर्ट आपल्याला बरंच काही सांगुन जातो. आपल्या कुटुंबातील संवाद संपत चालला आहे येथून एकटेपणाची सुरुवात होते. शिक्षणामध्ये गुरू शिष्य नात्यातील संवाद संपत चालला असून तो आता व्यवहार होत चालला आहे. सोशल मीडियाच्या अभासी जगात आपण ज्ञानी कमी पण अज्ञानी जास्त होत चाललोय. फेसबुक वर टाकलेल्या पोस्ट लाईक कमी मिळाल्यावर नैराश्‍यात जाताना अनेक युवक आपल्याला दिसतात. दरवेळेस सोशल मिडीयामुळे आपण तुलना करण्यात जास्त अडकून पडलो आहोत. सोशल मीडिया आपलं जग आहे ते सोडल तर आपलं जीवन अशक्‍य आहे ही सवय आपण आपल्याला लावून घेतली आहे. या सगळ्या गोष्टी मधून जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायचे असते त्या वेळेस आपले म्हणणे ऐकायला कोणीच नसतं तेथून आपल्या एकटेपणाची सुरवात होते.

– प्रथमेश कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)