नवी दिल्ली -सतराव्या लोकसभेसाठी भाजपा खासदार वीरेंद्र कुमार यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वीरेंद्र कुमार हे टिकमगढचे खासदार आहेत. आता ते खासदारांना शपथ देतील.
या अगोदर लोकसभा हंगामी अध्यक्ष पदासाठी बरेलीचे खासदार संतोष गंगवार व सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी यांची नाव समोर आली होती, मात्र अखेर भाजपा नेतृत्वाने वीरेंद्र कुमार यांना संधी दिली