नवी दिल्ली : मागील काही वर्षापासून तीन प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व राखणा-या भारतीय कर्णधार विराट कोहली याची लंडनमधील प्रसिध्द मॅग्झिन ‘द क्रिकेटर’ने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड केली. द क्रिकेट मॅग्झिनने दशकातील टाॅप-५० क्रिकेटपटूची यादी तयार केली आहे, यामध्ये महिला व पुरूष दोन्ही क्रिकेटपटूचा समावेश आहे.
🏏 50 BEST CRICKETERS OF THE DECADE – THE TOP 10 🏏
We have been counting down the best players of the 2010s for the last week.
Here are the top ten…https://t.co/duBDoA5cGO
— The Cricketer (@TheCricketerMag) December 25, 2019
भारताच्या कोहलीशिवाय यामध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (१४ व्या), वनडेत तीन व्दिशतक झळकवणारा रोहित शर्मा (१५व्या), विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (३५ व्या), अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (३६ व्या) आणि महिला संघाची दिग्गज खेळाडू मिताली राज (४० व्या) यांचा समावेश आहे.
द क्रिकेटरने म्हटले आहे की, कोहलीची निवड ही सर्वांच्या मताने झाली आहे. कोहलीने या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक २०,९६० धावा केल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुस-या स्थानी आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके झळकावली आहेत. यामधील ६९ शतके त्याने २०१० ते २०१९ दरम्यान केली आहेत. कोहलीने कर्णधार म्हणून १६६ सामने खेळले असून यामध्ये फलंदाजी करताना त्यांची सरासरी ६६.८८ होती.
दशकातील यादीत टाॅप-१० मध्ये विराटनंतर जेम्स अंडरसन, आॅस्ट्रेलिया महिला क्रिकेटर एलिस पैरी, स्टीव स्मिथ, हाशिम अमला, केन विलियमसन, एबी डिविलयर्स, कुमार संगकारा, डेव्हिड वाॅर्नर आणि डेल स्टेन यांचा समावेश करण्यात आला आहे.
आश्विन भारतीय क्रिकेट मध्ये दुस-या स्थानी आहे. त्याने २०१० ते २०१९ दरम्यान सर्वाधिक बळी मिळवले आहेत. त्याने कसोटीत ३६२, वन-डे , टी-२९ मध्ये २०२ गडी बाद केले आहेत.