दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एकदिवसीय सामन्यांसाठीची ताजी क्रमवारी जाहीर केली असून फलंदाजीमध्ये भारताचे वर्चस्व आढळून येत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे.
🔸 Warner swaps places with Williamson
🔸 Aaron Finch enters top 10After the #INDvAUS series, Australia openers make gains in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Rankings for batting.
Full rankings: https://t.co/tHR5rKl2SH pic.twitter.com/vZRRev7Upy
— ICC (@ICC) January 20, 2020
आॅस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेतील कामगिरीमुळे कोहली आणि रोहित यांच्या खात्यात अनुक्रमे २ व ३ गुणांची वाढ झाली असून विराट ८८६ गुणांसह अव्वलस्थानी तर रोहित ८६८ गुणांसह दुस-या स्थानी आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ८२९ गुणांसह तिस-या स्थानी आहे.
आॅस्ट्रेलियन संघाचा कर्णधार याने क्रमवारीत टाॅप-१० मध्ये प्रवेश केला आहे तर डेव्हिड वाॅर्नरने एका स्थानाची झेप घेतली आहे. डेव्हिड वाॅर्नर ७९६ गुणांसह ६ व्या तर अॅरन फिंच ७६९ गुणंसह १० व्या स्थानी पोहचला आहे.