#ICCWorldCup2019 : मादाम तुसॉंने केले ‘विराट’च्या पुतळ्याचे अनावरण

लंडन – क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मादाम तुसॉं संग्रहालयातर्फे कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या पुतळ्यासाठी कोहलीने त्याची विश्‍वचषकासाठीची अधिकृत जर्सी, बूट आणि ग्लोज दान केले आहेत. उसेन बोल्ट आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्‍तीत कोहलीचा पुतळा असणार आहे.

मादाम तुसॉं संग्रहालयाचे सरचिटणीस स्टीव्ह डेव्हीस याविषयी बोलताना म्हणाले की, पुढील दीड महिना क्रिकेटचा ज्वर चांगलाच वाढलेला दिसणार आहे आणि विराटच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या क्रिकेटमय वातावरणाव्यतिरिक्त दुसरी वेळ असूच शकत नाही. क्रिकेट चाहते त्यांच्या फेव्हरेट खेळाडूचा खेळ पाहण्याचा आनंद लुटतीलच सोबत लंडन येथील मादान तुसॉं संग्रहालयात ठेवण्यात आलेला विराटचा पुतळा पाहण्यासाठी गर्दी करतील, असा आम्हाला विश्‍वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.