मुंबई – भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. त्याचे तब्बल तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय शतक साकार झाले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली असून, त्याच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल 50 कोटींच्या पुढे गेली आहे.
अमिरातीत नुकत्याच पार पडलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत कोहलीने कारकिर्दीतील 71 वे आंतरराष्ट्रीय शतक फटकावले. आता फॉलोअर्सच्या बाबतीत भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अकाउंट कोहलीचेच ठरले आहे. कोहलीपेक्षा भारताचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटचे फॉलोअर्स जास्त आहेत.
पीएमओचे 50.5 मिलियन, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 82.4 मिलियन (जवळापास 82 कोटी) फॉलोअर्स आहेत. मात्र, ट्विटवर सर्वाधिक फॉलो होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत कोहलीच अव्वल स्थानी आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याचे 37.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. या दोघांशिवाय 100 व्यक्तींच्या यादीत अन्य कोणत्याही क्रिकेटपटूचा समावेश नाही.