नवी दिल्ली – करोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या प्रयत्नांना आपण सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देशवासियांना आवाहन केले आहे.
Be alert, attentive and aware to combat the threat posed by the Covid 19. We, as responsible citizens, need to adhere to the norms put in place for our safety as announced by our Honourable Prime Minister Shri @NarendraModi ji. #IndiaFightsCorona
— Virat Kohli (@imVkohli) March 19, 2020
करोना अत्यंत वेगाने संपूर्ण जग व्यापत आहे, त्यावर अद्याप तरी रामबाण उपाय सापडलेला नाही, मग अशा स्थितीत विनाकरण धोका पत्करण्यात काही अर्थ नाही, उलट याचा सामना करण्यासाठी देशभरात जे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याला सहकार्य करणे आवश्यक आहे. चीनपासून करोनाचा प्रभाव संपूर्ण जगात पसरलेला आहे, त्याच चीनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकारात्मक चित्र दिसू लागले आहे, म्हणजेच या संकटावर आपण मात करू शकतो हेच दिसून येत आहे.
आपली लोकसंख्या मोठी आहे त्यामुळे हा करोना आणखी पसरला तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लावला तरी भीती वाटते. यावर सगळे प्रयत्न करत असताना त्याला सहकार्य करणे हा एकच उपाय सध्यातरी दिसत आहे, त्यामुळे सरकारने केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घ्या असे आवाहनही कोहलीने केले आहे.