क्रिकेटच्या सन्मानासाठी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा उपयुक्त- कोहली

नवी दिल्ली – कसोटी सामना हाच क्रिकेटचा खरा आत्मा आहे आणि तो टिकविण्यासाठी अयोजित करण्यात आलेली आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा अतिशय उपयुक्त आहे असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले. ही स्पर्धा दिनांक 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 27 मालिकांधील 71 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व वेस्ट इंडिज या नऊ देशांचा सहभाग असणार आहे. ही स्पर्धा दोन वर्ष चालणार आहे. प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघाबरोबर मायदेशात तीन सामने व तर प्रतिस्पर्ध्याच्या देशात तीन मालिका खेळणार आहे. साखळी गटात पहिले दोन क्रमांक मिळविणारे संघ 2021 मध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील व ही फेरी इंग्लंडमध्ये फोईल.

कोहली म्हणाला, या स्पर्धेची आम्हाला उत्कंठा आहे. कसोटीमध्ये खेळाडूच्या सर्वांगिण कौशल्यास पूर्ण वाव असतो. हा सामना पाच दिवसांचा असल्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला संधी मिळत असते. तसेच खेळाडू हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे याचीही परिक्षा असते. कसोटी हा पारंपरिक परंतु आव्हानात्मक प्रकार आहे. भारतीय संघातील खेळाडूही या आव्हानास यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.