Virat Kohli | क्रिकेटच्या तीनही प्रकारात कोहलीचे वर्चस्व

अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भरात आलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक अनोखी कामगिरी नोंदली गेली आहे. आयसीसीने जाहीर झालेल्या फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत कोहली पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचे 744 गुण जमा झाले असून एकदिवसीय क्रमवारीत तो पहिल्या तर कसोटी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो पहिल्या पाच क्रमांकात दाखल झाला असून अशी कामगिरी करणारा कोहली पहिलाच फलंदाज ठरला आहे.

लोकेश राहुल या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याच्याकडे 894 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा ऍरन फिंच दुसऱ्या तर, पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जोस बटलर या क्रमवारीत 19 व्या स्थानी आहे. फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत श्रेयस अय्यर 32 स्थानांची झेप घेत 31 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 80 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर 11 व्या स्थानावर आहे.

क्रमवारीत पदार्पणापासूनच कोहलीने सातत्याने वर्चस्व राखले आहे. सुरूवातीच्या काळात कसोटी क्रमवारीत त्याला पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळत नव्हते. मात्र, त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापीत केले. इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेत कोहलीने सलग र्दीोंन अर्धशतके फटकावत क्रमवारीत प्रगती केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.