नवी दिल्ली : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील 47 वा सामना भारत आणि बांगलदेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातही भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माने डावाची सुरुवात केली. या सामन्यात त्याने 28 चेंडूंचा सामना करत 37 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
काय आहे तो विक्रम?
विराटला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. माज्ञ या सुरुवातीचं रुपांतर त्याला मोठ्या खेळीच्या रुपात करता आलं नाही. तो 37 धावा करत माघारी परतला. यासह त्याने वर्ल्डकप स्पर्धेत 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याच फलंदाजाला 3000 धावांचा पल्ला गाठता आलेला नाही.