पुणे : विराट कोहली बरसायला लागला की थांबायचे नाव घेत नाही. आजही भारताच्या या रन मशीनने द. अफ्रिकेविरूध्द व्दिशतकीखेळी करत आपल्या विक्रमांत भर घातली. हे विराटचे सातवे अर्धशतक आहे. याबरोबरच त्याने सेहवाग आणि सचीन तेंडूलकरचा सहा द्विशतकाचा विक्रम मागे टाकला.
द. अफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज सेन्युरान मुथुस्वामी याच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत आपल्या व्दिशतकावर शिक्कामोर्तब केले. अवघ्या 295 चेंडींचा मुकाबला करत त्याने हा विक्रम नोंदवला. द. अफ्रिकेविरूध्द व्दिशतक झळकवणारा तो पहिलाच भारतीय कप्तान ठरला. विरेंद्र सेहवाग (319 धावा 2008 मध्ये चेन्नई येथे) आणि मयंक अग्रवाल (215 धावा 2015 विझअग येथे) यांच्या पाठोपाठ तिसरा खेळाडू ठरला. विराटने यापुर्वी वेस्ट इंडिजविरूध्द 2016मध्ये नॉर्थ साउंड येथे, 2016मध्ये न्यूझिलंड विरूध्द इंदोरमध्ये, त्याचवर्षी इंग्लंडविरूध्द मुंबईमध्ये, तर 2017 मध्ये बांगलादेशविरूध्द हैदराबाद येथे, त्याच वर्षी दिल्ली आणि नागपूरमध्ये श्रीलंकेविरूध्द अशी सहा व्दिशतके झळकावली होती.
कप्तान झाल्यावर 40 शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदवला गेला. त्याच्यापेक्षा पुढे फक्त रिकी पॉंटींगचा विक्रम आहे. त्याने कप्तान असताना 41 शतके झळकावली होती.