Virat Kohli | कोहलीचे एक डझन भोपळे

कारकिर्दीत बारा वेळा शुन्यावर बाद

अहमदाबाद  -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला. कसोटी कारकिर्दीत बारा वेळा बाद होण्याचा निराशाजनक विक्रम आता त्याच्या नावावर नोंदला गेला आहे.

शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍स याच्या चेंडूवर बेन फोक्‍सने कोहलीचा झेल अप्रतिमरीत्या घेतला व स्कोअररला कोणताही त्रास न देता कोहली तंबूत परतला. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत कोहली दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला. याआधी चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात तो शुन्यावर बाद झाला होता.

कसोटी मालिकेत दोन वेळा शुन्यावर बाद होण्याची ही कोहलीची दुसरी वेळ आहे. याआधी 2014 साली इंग्लंडविरुद्धच्याच मालिकेत तो दोन वेळा शुन्यावर बाद झाला होता. स्टोक्‍सने त्याला पाचव्यांदा बाद केले आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत तो चौथ्यांचा शुन्यावर बाद झाला आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये जसप्रीत बुमराह चार वेळा, महंमद शमी व चेतेश्‍वर पुजार प्रत्येकी 3 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

2019 साली कोहलीने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी (136) केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अद्याप एकदाही शतक फटकावता आलेले नाही. कोहलीने गेलेल्या 12 कसोटीत 1, 19, 3, 14, 74, 4, 11, 72, 0, 62, 27, 0 अशा धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणूनही सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याच्या नकोशी कामगिरी त्याच्याच नावावर नोंदली गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.