#CWC2019 : निळ्या रंगाचा जर्सी योग्य – कोहली

लंडन – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ हा 12 व्या विश्‍वचषक स्पर्धेत खेळत आहे. त्यातच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी वापरणार आहे. या जर्सीबद्दल शुक्रवारी बीसीसीआयने अधिकृत जाहीर केलं होतं. शनिवारी जर्सीवर भारतीय कर्णधार विराट कोहली याने माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नारंगी रंगाचा जर्सी आकर्षक आहे. एक दोन सामन्यांपुरता किंवा एखाद्या कार्यक्रमाकरिता हा जर्सी घालणे ठीक आहे. या जर्सीवरील नक्षीकाम, बोधचिन्ह आदी गोष्टी खूप चांगल्या रीतीने केल्या आहेत. मी या जर्सीला दहापैकी आठ गुण देईन.

मात्र, कायमस्वरूपी हा जर्सी परिधान करणे अवघड आहे. निळ्या रंगाचा जर्सी घालून जिंकण्याची आम्हाला सवय झाली आहे. आमच्या चाहत्यांनाही हा रंग अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळेच आम्ही निळ्या रंगाच्या जर्सीला प्राधान्य देणार आहोत असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले. भारतीय महिला फुटबॉल संघाने आशियाई चषक स्पर्धेत नारंगी रंगाचा जर्सी परिधान केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.