Virat Kohli – भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे आज ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाचा कर्णधार दसून शनाका याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय संघाने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर विरोधी कारधाराचा नाणेफेकीचा निर्णय चुकीचा ठरवला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११३ धावांची शतकीय खेळी खेळली.
“आमच्यासाठी संघाचे हित महत्त्वाचे…”, रोहितच्या ‘त्या’ विधानावर BCCI आक्रमक!
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून ३७३ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला सलामीला दमदार सुरुवात करून दिली. गिलने ७० धावा तर रोहितने ८३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मैदानावर आलेल्या विराटने श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. कोणताही फलंदाज विराटला जास्त अडचणीत आणू शकला नाही. विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक झळकावले आहे. या शतकासह त्याने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे.
विश्वविक्रम विराटच्या नावावर
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात विराटने सर्वात वेगाने १२ हजार ५०० धावांचा टप्पा गाठण्याचा विश्व विक्रम नावावर केला. विराटने हा विक्रमीटप्पा २५७ डावांमध्ये पार केला आहे. ही कामगिरी करण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला ३१० डाव खेळावे लागले होते. सचिननंतर रिकी पाँटिंग ३२८ डाव, कुमार संगकारा ३४५ डाव, सनथ जयसूर्या ४०२ डाव आणि माहेला जयवर्धने ४११ डावांमध्ये ही कामगिरी केलेली आहे. विराटने ही कामगिरी सर्वात जलद करत विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय.
D. E. C. O. D. E. D!
How @imVkohli did not even break a sweat as he scored a 💯 🤔
🗣️ Here’s what he saidFollow the match 👉 https://t.co/262rcUdafb#TeamIndia | #INDvSL pic.twitter.com/t5YAydjytL
— BCCI (@BCCI) January 10, 2023
श्रीलंकेविरुद्धच्या हा खास विक्रमही नावावर
भारताकडून श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतही विराटने सचिनला मागे टाकले आहे. विराटने या संघाविरुद्ध ४८ सामन्यात ९ शतक झळकावले आहेत. तर सचिनने ८४ एकदिवसीय सामन्यात ८ शतक झळकावलेली आहेत. त्याचबरोबर कोहलीने घरच्या मैदानावर १०२ सामन्यात २०वे एकदिवसीय शतक झळकावले. याबाबतीत सचिन तेंडुलकरच्या १६४ सामन्यात २० एकदिवसीय शतकांच्या कामगिरीला विराटने मागे टाकले आहे. सचिनच्या तुलनेत सध्या विराट कोहली खूपच जलद विक्रम रचत असल्याचे दिसत आहे.