विराट कोहली इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरू शकतो – ग्रॅहॅम गूच 

चेम्सफोर्ड: आगामी कसोटी मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची चांगल्या कामगिरीची जिद्द यजमान संघासाठी खतरनाक ठरू शकते त्यामुळे विराट कोहली हा यंदाच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो, असे इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहॅम गूच याला वाटते.

गूचने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “विराट कोहली सध्या अव्वल रॅंकिंगप्राप्त खेळाडू आहे आणि माझ्या मते इंग्लंडसाठी तो खतरनाक ठरू शकतो. मागच्या दौऱ्या वेळी कोहली हा चांगली कामगीरी करण्यात अपयशी ठरला होता त्यामुळे यंदाच्या मोसमात तो इंग्लंडविरुद्ध कामगिरी उंचावण्यासाठी जास्त प्रयत्न करेल. आणि त्यामुळेच इंग्लंड संघासाठी ती धोक्‍याची घंटा असू शकते.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांच्यातील तुलनेविषयी विचारले असता गूच म्हणाला, दोघेही क्रिकेटच्या सर्वच स्वरूपात विश्वस्तरीय खेळाडू आहेत आणि दोघेही मॅचविनर आहेत. मला या दोघांची फलंदाजी पाहण्यास आनंद वाटतो. या दोघांनी केलेल्या धावा नव्हे तर त्यांनी किती खेळ्या करून संघाला विजय मिळवून दिला हे लोकांनी लक्षात ठेवायला हवे. प्रतिकूल परिस्थितीत 50 अथवा मुर्दाड खेळपट्टीवरील 150 धावा केल्या असल्या तरी त्या खेळीने संघ विजयी झाला हे तेव्हा अभिमानास्पद वाटते. गूचने भारतीय संघ चांगला असल्याचे म्हटले आहे. दोन्ही संघांदरम्यान पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून बर्मिंगहम येथे सुरू होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)